Ad will apear here
Next
रसिकांकडून मिळालेला सन्मान हीच खरी आयुष्याची पुंजी : पं. कुमार बोस
पं. कुमार बोस ‘उस्ताद मेहबूब खानसाहेब मिरजकर’ पुरस्काराने सन्मानित
पं. कुमार बोस यांना ‘उस्ताद मेहबूब खानसाहेब मिरजकर’ पुरस्कार प्रदान करताना (डावीकडून) रिझवान मिरजकर, उस्ताद उस्मान खान, उस्ताद फैय्याज हुसैन खान, पं. उपेंद्र भट, नवाझ मिरजकर व केतन बिडवे

पुणे : ‘कला ही परमेश्वराची देणगी आहे. ही कला गुरुकडून शिष्यांकडे हस्तांतरीत होते. प्रत्येक कलाकार हा आपल्या कलेच्या माध्यमातून आपल्या गुरुची सेवा करत असतो. ही सेवा घडताना रसिक श्रोत्यांकडून मिळालेला सन्मान हीच त्याची आयुष्यभराची पुंजी असते,’ अशी भावना बनारस घराण्याचे तबलावादक पं. कुमार बोस यांनी व्यक्त केली.   

उस्ताद मेहबूब खानसाहेब मिरजकर यांच्या ५४ व्या तर गुरु उस्ताद मोहंमद हनीफ खान मिरजकर यांच्या पाचव्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘तालविश्व’च्या वतीने आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहांमध्ये ‘संगीत विरासत’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पं. कुमार बोस
संगीत क्षेत्रात आपल्या तबलावादनाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या कलाकारांना ‘तालविश्व’च्या वतीने गौरविण्यात येते. या वर्षी प्रसिद्ध तबलावादक पं. कुमार बोस यांना उस्ताद उस्मान खान, उस्ताद फैय्याज हुसैन खान व पं. उपेंद्र भट यांच्या हस्ते ‘उस्ताद मेहबूब खानसाहेब मिरजकर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी माजी आमदार उल्हास पवार, पं. अरविंदकुमार आझाद, पं. रघुनाथ खंडाळकर, पं. विठ्ठल क्षीरसागर, ‘तालविश्व’चे नवाझ मिरजकर, रिझवान मिरजकर, केतन बिडवे आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात बनारस घराण्याचे प्रसिद्ध तबलावादक पं. कुमार बोस यांच्या वादनाला तन्मय देवचक्के यांनी संवादिनीवर साथसंगत केली. प्रसिद्ध सितारवादक मोहसीन खान व सरोदवादक सारंग कुलकर्णी यांच्या जुगलबंदीला उपस्थित रसिकांनी भरभरून दाद दिली. त्याला नवाझ मिरजकर व केतन बिडवे यांनी तबल्यावर साथसंगत केली.

जुगलबंदी सादर करताना नवाज मिरजकर, सारंग कुलकर्णी, मोहसीन खान व केतन बिडवे

या वेळी बोलताना पं. कुमार बोस म्हणाले, ‘पुण्याने कला क्षेत्राला अनेक दिग्गज कलाकार दिले आहेत. चोखंदळ पुणेकर कलाकाराची पारख करून त्याचप्रकारची दाद देतो. येथे वादन करताना नेहमीच ठेवणीतील काहीतरी सादर करावे लागते.’ 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिझवान मिरजकर यांनी केले, तर केतन बिडवे यांनी आभार मानले.    
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZBOCH
Similar Posts
अमेरिकन सरोदवादक केन झुकरमन यांनी उलगडली कारकीर्द पुणे : गिटार वाजवत असताना आणि भारतीय शास्त्रीय संगीताचा गंधही नसताना सरोदने घातलेली भुरळ, प्रथम सतार शिकण्यास केलेली सुरुवात आणि पुन्हा सरोदच्या शिक्षणाकडे वळलेले पाय आणि सरोदलाच वाहून घेण्याचा मनाने घेतलेला निर्णय… अमेरिकेतील प्रख्यात सरोदवादक केन झुकरमन यांनी आपला प्रवास ‘सवाई’च्या ‘अंतरंग’ कार्यक्रमात उलगडला
६५व्या वर्षी मॅरेथॉन जिंकणाऱ्या लता भगवान करेंची संघर्षगाथा चित्रपट रूपात पुणे : एखादी सामान्य व्यक्तीही रोजच्या जगण्याचा संघर्ष करत असताना एखादी अफाट कामगिरी करून जाते आणि सारी दुनिया थक्क होते. अशीच एक प्रकाशझोतात आलेली व्यक्ती म्हणजे ६५ व्या वर्षी अनवाणी पायाने धावून बारामतीतील शरद मॅरेथॉन जिंकणाऱ्या लता करे. त्यांच्या आयुष्यावर ‘लता भगवान करे - एक संघर्षगाथा’ हा चित्रपट
पुण्याच्या ओंकार मोदगीचा लघुपट एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुणे : पुण्यातील पटकथालेखक व दिग्दर्शक ओंकार मोदगी याच्या ‘डोगमा’ या लघुचित्रपटाची लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या एशियन फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड झाली आहे. गुरुवारी, १२ डिसेंबर रोजी लॉस एंजिलिसमध्ये हा लघुचित्रपट दाखवला जाणार आहे.
‘संगीत आनंदासाठी आहे, मुलांना त्याचा ताण देऊ नका’ पुणे : ‘सुरांमध्ये खेळणे, त्याच्या नादात रममाण होणे यामुळे जीवनातील आनंद वाढतो. संगीत आयुष्याची सुंदरता वाढवते. रोजचे ताण कमी होतात आणि तुमची एकाग्रता, कार्यक्षमता आपोआपच वाढते; मात्र हल्लीचे पालक ‘रिअॅलिटी शो’ सारख्या कार्यक्रमांद्वारे मुलांवरचा संगीताचाच ताण वाढवतात. मुलांचे बालपण हिरावून घेऊ नका.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language